Sarita: आजच्या स्मार्ट फोन काळातला एक रूटीन दिवस
परवा वीणा (नाव बदलले आहे) आपल्या कॉलेज मधल्या मुलाला म्हणजे रोहन ला घेऊन आली . वीणा : मॅडम तुम्ही ह्याचे काउन्सलिंग करा बरं , काही तरी समजवा तुमचे ऐकेल, घरात आमचे कोणाचेच ऐकत नाही सतत मोबाईल वर असतो आणि इतका गर्क असतो की आम्ही काय बोलतो हे सुद्धा त्याला ऐकू येत नाही की ऐकून न ऐकल्या सारखे करतो महित नाही.
आजच्या काळात मोबाईलवरच्या व्हॉट्सएप, फेसबुक वापराने अनेक जुने मित्रमंडळी, नातेवाईक इ. संबंधित सापडतात, दुरवर राहणारे नातेवाईक जवळ असल्यासारखेच वाटतात. मनात येईल तेव्हा त्यांच्याशी बोलू शकतो. व्हाट्सएप वर आपले असे सर्वांचे वेगवेगळे असंख्य ग्रुप्स असतात.
शाळेतले , गल्लीतले, बिल्डिंगमधले, सोसाईटीतले, कॉलेजमधले मित्रमैत्रीण , जवळ राहणारे नातेवाईक, गावाला राहणारे नातेवाईक त्यातून मामाकडचे , काकाकडचे वेगळे , कुटुंबातील , कामातील सहकारी , बॉइज स्पेशल , गर्ल्स स्पेशल... अनेक सोशलमीडिया , शॉपिंग ऍप्स , गेम्स इ. असा एकंदरीत आपला मोबाईलचा वापर सर्वत्र दिसून येतो. आता पुढे पाहुया ..
रोहन एकदम शांत बसून होता... (पूर्ण मजकूर जसाच्या तसा येथे चालू राहील) ...
आपण आपल्या पिढीचे आणि पुढच्या पिढीचे बहुमुल्य आयुष्य एका गैजेटच्या हाती दिले आहे असे म्हणायला हरकत नाही.
सरिता चौधरी
मानसशास्त्रीय समुपदेशक